Nana Patole | “दुसऱ्याची घरं फोडून आनंद व्यक्त करताय?, पण आता विदर्भात आग लागलीय त्याच काय?”

Nana Patole । मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा-शिंदे गटावर मात करत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालावर (Nashik Graduate Constituency Election Results) सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं.

या जागेवर विजयी उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सत्यजित तांबेंच्या या बंडखोरीमागे भाजपाचाच हात आहे, असा दावा काँग्रेसकडून केला जात होता. सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आनंद व्यक्त केला, त्यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाष्य केले आहे.

नाशिक जागेसाठी भाजपाने केलेली खेळी आमच्या जिव्हारी लागलेली आहे. त्या भागातून आमचा एक नेता त्यांनी नेला असला तरी तेथून आगामी काळात आम्ही ५० आमदार निर्माण करणार असल्याचं ते म्हणाले. नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांच्यावर बोलणं टाळत भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यामध्ये भाजपची पहिल्यापासून भूमिका घरं फोडण्याची असल्याचं म्हंटलं आहे.

भाजपनं सत्तेचा दुरुपयोग केला असून त्याची फळं भाजप (BJP) भोगत आहे. भाजप दुसऱ्याची घरं फोडतं, त्याचा आनंद साजरा करत आहे, पण आता विदर्भात आग लागली आहे, अशी प्रतिक्रिया काॅंग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. अमरावती-नागपुरात भाजप नेत्यांनीच आम्हाला मदत केली असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button