Share

Amravati Election | मोठी बातमी! माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा अमरावतीत पराभव

🕒 1 min read Amravati Election | अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे रणजित पाटील (Ranjit Patil) यांचा पराभव झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे. रणजित देशमुख यांचा पराभव हा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Amravati Election | अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे रणजित पाटील (Ranjit Patil) यांचा पराभव झालाय.

महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे. रणजित देशमुख यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. थोड्याच वेळात निवडणूक अधिकारी त्यांच्या विजयाची घोषणा केली जाणार आहे.

विशेष म्हणजे रणजित पाटील हे महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आहेत. ते याच मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते.

Amravati Election Result Dhiraj Patil Won

देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे त्यांचा पराभव हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. धीरज लिंगाडे पाटील यांना 46 हजार 344 मते मिळाली. तर रणजित देशमुख यांना 42 हजार 962 मते मिळाली आहेत. रणजित पाटील ( Ranjeet Patil Lost Amravati Election ) यांनी फेरमोजणीची मागणी केल्यामुळे या सगळ्या कार्यप्रणालीला तब्बल 30 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला.

कोण आहेत धीरज लिंगाडे ? ( Who is Dheeraj Lingade Patil )

  • धीरज लिंगाडे यांचे वडिल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ते स्वतः शिवसेनेतून नगरसेवक होते. आता काँग्रेसकडून त्यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळविली. त्यात त्यांनी रणजित पाटील यांचा पराभव केला.
  • धीरज रामभाऊ लिंगाडे यांचा जन्म ६ एप्रिल १९७२ चा. शिक्षण B. A., LLB पर्यंत झालेले. १९९८ ला नगरसेवक म्हणून पहिल्यांदा काँग्रेसकडून विजयी झाले होते. २०१० ला शिवसेना बुलढाणा जिल्हाप्रमुख होते. पुढे शिवसेनेमध्ये कार्यरत होते. २०२३ ला विधान परिषद निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  • धीरज यांच्या पत्नीचे नाव पद्मजा लिंगाडे आहे. त्यांना दोन मुलं आहेत. वडील स्व. रामभाऊ बाबूराव लिंगाडे हे माजी गृहराज्यमंत्री होते. १९७८ ते १९८३ या कालावधीत विधान परिषद आमदार होते.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या