Holiday Destinations | निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी साजरी करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम पर्याय

Holiday Destinations | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिना हा पर्यटकांचा आवडता महिना आहे. कारण या महिन्यामध्ये फिरण्यासाठी (Travel) वातावरण अतिशय अनुकूल असते. फेब्रुवारी महिन्यात हवामान जास्त उष्ण आणि जास्त थंडही नसते. त्यामुळे या महिन्यात निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाण्याची मजा वेगळीच असते. तुम्ही पण जर निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी साजरी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही निसर्गरम्य ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. तुम्ही पुढील निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊ शकतात.

कौसानी

कौसानी हे ठिकाण उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे. कौसानीला भारतातील स्विझर्लंड म्हणून देखील ओळखले जाते. तुम्ही जर निसर्गसौंदर्याच्या सानिध्यात तुमची सुट्टी साजरी करण्याचा विचार करत असाल, तर कौसानी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय (Holiday Destinations) ठरू शकतो. या ठिकाणी तुम्हाला रुद्रधारी धबधबा, सारला आश्रम, वैजनाथ, तारांगण इत्यादी प्रेक्षणीय स्थळे बघायला मिळतील. या ठिकाणी तुम्हाला उत्कृष्ट निसर्गाचे नजारे दिसतील.

कन्याकुमारी

कन्याकुमारीमध्ये तुम्ही तुमची सुट्टी शांततेत साजरी करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला सर्वोत्तम उगवत्या सूर्याचा नजारा बघायला मिळेल. या ठिकाणी सूर्योदयासोबतच सूर्यास्त देखील तितकाच सुंदर असतो. कन्याकुमारीमध्ये तुम्ही थिरपराप्पू फॉल्स, विवेकानंद मेमोरियल, थनुमलयन मंदिर, कुमारी अम्मान मंदिर या ठिकाणांना (Holiday Destinations) भेट देऊ शकतात.

हम्पी

कर्नाटक राज्यामध्ये स्थित असलेले हम्पी एक ऐतिहासिक शहर आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतील. हम्पीमध्ये तुम्हाला ट्रेकिंगचा देखील आनंद घेता येऊ शकतो. हम्पीमध्ये तुम्ही स्कूटर भाड्याने घेऊन येतील प्रेक्षणीय स्थळांना (Holiday Destinations) भेट देऊ शकतात.

बनारस

बनारस हे शहर तेथील घाटांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वोत्तम गंगा आरतीचा अनुभव देखील घ्यायला मिळेल. बनारसमध्ये सकाळी बोटीत बसून फिरणे आणि पक्ष्यांच्या किलबिलटांचा आनंद घेणे, खरोखरच रोमांचक अनुभव आहे. बनारस या पवित्र शहरामध्ये तुम्ही तुमची सुट्टी निवांत साजरी करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

Back to top button