IND vs AUS | चाहत्यांसाठी खुशखबर! भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका बघता येणार मोफत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लवकरच कसोटी मालिका सुरू होणार आहे. 9 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ तयारी करत आहे. दरम्यान, ही मालिका सुरू होण्यापूर्वी बीसीसीआय (BCCI) ने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेट चाहत्यांना ही मालिका मोफत बघता येणार आहे. याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारी कसोटी मालिका स्टार स्पोर्ट्स तसेच डीडी स्पोर्ट्सवर फ्री बघता येऊ शकते. डीडी इंडियाने ही माहिती दिली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 9 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना नवी दिल्ली येथे 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान खेळण्यात येणार आहे. 1 ते 15 मार्च दरम्यान या मालिकेतील तिसरा सामना धर्मशाळा येथे होणार आहे. तर या मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना 9 ते 13 मार्च दरम्यान अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.