Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय; शुभांगी पाटलांच्या पदरी निराशा

MLC Election Result |  नाशिक : राज्यात 5 मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे ( Satyajeet Tambe ) यांनी अपक्ष उमेवारीवर तसेच भाजपच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढवली आहे. त्यांना ‘काटे की टक्कर’ देणाऱ्या तसेच महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली आहे.

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असणाऱ्या नाशिक निवडणुकीचा निकाल आता हाती आला असून सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांचा या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी दारुण पराभव केला आहे.

Satyajeet Tambe Won Nashik Graduate Constituency

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांची आघाडी होते. सत्यजीत तांबे ( Satyajeet Tambe ) हे आघाडीवर असल्याचे कळताच मतदान केंद्राबाहेर तांबेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष करण्यात आला आहे. सत्यजित तांब्येंच्या समर्थनात युवा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळली. या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मतमोजणी प्रवेशद्वारापासून दोनशे ते अडीचशे मीटर दूर पिटळून लावल्यंही पाहायला मिळालं आहे.

या मतमोजणीपूर्वीच नाशिक पदवीधर मतदारसंघात मोठ्याप्रमाणावर मतं बाद ठरली आहेत. त्यामुळे विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला होता. परिणामी ही मतमोजणी शेवटच्या फेरीपर्यंत रंगली होती. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. सत्यजीत तांबे यांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाचा जल्लोष करणारे लावलेले बॅनर्स उतरवावे लागतील, असा इशारा शुभांगी पाटील यांनी दिला होता. मात्र आता निकालानंतर सत्यजीत तांबेंच्या विजयाची घोषणा झाली.

दरम्यान, काँग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म दिला असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सुधीर तांबे यांनी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांना अपक्ष अर्ज भरण्यासाठी मदत केली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून काँग्रेसकडून पिता-पुत्रांवर निलंबनाची कारावाई करण्यात आली. काँग्रेसमधील या राजकीय घडामोडीनंतर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले होते.

महत्वाच्या बातम्या

Back to top button