Trekking Destination | ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं करा एक्सप्लोर

Trekking Destination | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल ट्रेकिंगचा ट्रेंड वाढत चालला आहे. सोशल मीडियामुळे आणि चित्रपटांमुळे लोक ट्रेकिंगकडे आकर्षित होत आहे. भारतामध्ये ट्रेकिंगसाठी अनेक उत्कृष्ट ठिकाणं आहे. या ठिकाणी दिवसेंदिवस ट्रेकर्सची गर्दी वाढत चालली आहे. तुम्ही पण ट्रेकिंगला जाण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही योग्य बातमी वाचत आहात. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ट्रेकिंग पॉईंट्सबद्दल माहिती सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही पण जर ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

चेंब्रा पीक, केरळ

चेंब्रा पीक हे केरळमधील सर्वोच्च शिखर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला चहाचे मळे, घनदाट जंगल आणि मसाल्यांच्या सुगंधी भागांमधून जावे लागते. हा ट्रेक करताना वाटेत हृदयाच्या आकाराचा तलाव देखील लागतो. हा तलाव या ट्रेकचे मुख्य आकर्षण आहे. तुम्ही जर ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.

दयारा बुग्याल ट्रेक, उत्तराखंड

दयारा बुग्याल ट्रेक हिमालय पर्वत रांगेतील सर्वात सुंदर ट्रेकपैकी एक ट्रेक आहे. हा ट्रेक करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुले बघायला मिळतील. त्याचबरोबर या ट्रेकदरम्यान तुम्हाला हिमालयाचे मंत्रमुग्ध करणारे नजारे बघायला मिळतात. त्यामुळे तुम्ही जर हिमालय पर्वत रांगेत ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल, तर हे ठिकाण (Trekking Destination) तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.

गोमुख ट्रेक, उत्तराखंड

गोमुख ट्रेक हा गंगा नदीच्या उगमस्थानी असलेल्या गंगोत्री ग्लेशियरपासून सुरु होतो. या ट्रेकदरम्यान तुम्हाला शिवलिंग, भागीरथी, मेरू इत्यादी शिखरे बघायला मिळतील. हा ट्रेक करत असताना तुम्हाला निसर्गाचे उत्कृष्ट नजारे बघायला मिळतात. हिमालय पर्वतरांगेमध्ये हा देखील एक उत्तम ट्रेक आहे.

व्हॅली ऑफ फ्लावर्स, उत्तराखंड

व्हॅली ऑफ फ्लावर्स हा निसर्ग प्रेमींसाठी सर्वोत्तम ट्रेक ठरू शकतो. या ट्रेकला देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने जातात. कारण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फुले बघायला मिळतात. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या ट्रेकला विशेष महत्त्व आहे. कारण व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी बायोस्फियर रिझर्व अंतर्गत संरक्षित क्षेत्र आहे.

महत्वाच्या बातम्या