Potato & Lemon Juice | चेहऱ्यावर बटाटा आणि लिंबाचा रस लावल्याने ‘या’ समस्या होऊ शकतात दूर

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Potato & Lemon Juice | टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच सुंदर आणि निरोगी त्वचा हवी असते. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पोषक आहाराचे अभावामुळे त्वचा खराब व्हायला लागते. त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी अनेकजण बाजारामध्ये उपलब्ध असलेली रसायनयुक्त उत्पादन वापरतात. पण अनेकदा ही उत्पादन वापरल्याने चेहऱ्याला हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकतात. त्वचेवरील समस्या दूर करण्यासाठी तुम्ही बटाटा आणि लिंबाचा वापर करू शकतात. बटाटा आणि लिंबाच्या रसामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात, जे त्वचेवरील पुढील समस्या दूर करण्यास मदत करतात.

चेहऱ्यावरील काळी वर्तुळे कमी होतात- Potato & Lemon Juice

आजकाल अनेक लोकांचा बहुतांश वेळ स्क्रीन समोर जातो. त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे वाढायला लागतात. त्याचबरोबर व्यवस्थित झोप न मिळाल्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येऊ लागतात. चेहऱ्यावरील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बटाट्याचा आणि लिंबाचा रस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला दोन्ही गोष्टींचा रस एकत्र मिक्स करून घ्यावा लागेल. त्यानंतर कापसाच्या मदतीने हलक्या हाताने डोळ्याखाली त्याने मसाज करावी लागेल. वीस मिनिटं हे मिश्रण राहू दिल्यावर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. तुम्ही या मिश्रणाचा आठवड्यातून तीन वेळा वापर करू शकतात.

चेहऱ्यावरील पोर्स साफ होतात – Potato & Lemon Juice

चेहऱ्यावरील पोर्स साफ करण्यासाठी बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला अर्धा कप बटाट्याच्या रसामध्ये एका लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर या मिश्रणात बेकिंग सोडा आणि अर्धा कप पाणी मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला ते वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. हे मिश्रण चेहऱ्याला लावताना तुम्ही गोलाकार पद्धतीने मसाज करू शकतात. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

चेहऱ्याचा रंग उजळतो – Potato & Lemon Juice

चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी तुम्ही बटाटा आणि लिंबाचा रसाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला बटाट्याचा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe