Makeup Remover | टीम महाराष्ट्र देशा: दूध (Milk) आपल्या आरोग्यासोबतच (Health) चेहऱ्यासाठी (Skin) खूप फायदेशीर असते. दुधाच्या मदतीने त्वचेवरील अनेक समस्या सहज दूर होतात. त्यामुळे अनेकजण चेहऱ्याला दूध लावतात. चेहऱ्याला दूध लावल्याने मुरूम, पिंपल्स, ड्राय स्कीन इत्यादी समस्या दूर होतात. कारण दुधामध्ये विटामिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम, लॅक्टिक ॲसिड, प्रोटीन इत्यादी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी देखील तुम्ही दुधाचा वापर करू शकतात. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या रसायनयुक्त उत्पादनांच्या ऐवजी तुम्ही मेकअप काढण्यासाठी दुधाचा वापर करू शकतात. चेहऱ्यावरील मेकअप करण्यासाठी तुम्ही दुधाचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.
दूध आणि मध
तुम्ही दूध आणि मधाच्या मदतीने चेहऱ्यावरील मेकअप सहज काढू शकतात. यासाठी तुम्हाला तीन चमचे मधामध्ये दीड चमचा दूध मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर कापसाच्या मदतीने हलक्या हाताने तुम्हाला मेकअप काढावा लागेल. मेकअप काढून झाल्यावर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाने मेकअप काढल्यावर त्वचेवरील अतिरिक्त घाण साफ होऊन, चेहरा चमकदार होतो.
दूध आणि गुलाब जल
दूध आणि गुलाब जल दोन्हीही त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे मेकअप काढण्यासाठी तुम्ही या दोन्ही गोष्टींचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे दुधामध्ये दोन चमचे गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर कापसाच्या मदतीने तुम्हाला तुमचा मेकअप काढावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने मेकअप काढल्यावर त्वचेवरील चमक वाढण्यास मदत होऊ शकते.
दूध आणि लिंबू
दूध आणि लिंबाचा वापर करून तुम्ही मेकअप काढू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे दुधामध्ये दोन थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर कापसाच्या मदतीने तुम्हाला तुमचा मेकअप हळूहळू काढावा लागेल. मेकअप काढून झाल्यावर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. लिंबाच्या मदतीने मेकअप साफ केल्याने त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | “केंद्राला सर्वात जास्त पैसा महाराष्ट्रातूनच, मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’”
- Family Vacation | फॅमिली सोबत सुट्टीवर जाण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं ठरू शकतात सर्वोत्तम पर्याय
- Shubhangi Patil | काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार न केल्याच्या आरोपावर शुभांगी पाटलांचं स्पष्ट वक्तव्य
- Ajit Pawar | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ दाव्यावर अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “राजकीय द्वेषातून…”
- Konkan Teachers Constituency | कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी; प्रतिक्रिया देत म्हणाले…