Family Vacation | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिना फिरायला (Travel) जाण्यासाठी अतिशय उत्तम असतो. कारण या महिन्यामध्ये वातावरण आल्हाददायक असते. त्यामुळे पर्यटक या महिन्यात फिरायला जाण्यासाठी बाहेर पडतात. फेब्रुवारी महिना सुरू होताच अनेकजण मित्र आणि कुटुंबासोबत फिरायला जाण्याची तयारी करत असतात. तुम्ही पण जर या महिन्यात फॅमिलीसोबत फिरायला जाण्याची प्लॅनिंग करत असाल, तर तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.
दार्जिलिंग – Family Vacation
फॅमिलीसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी दार्जिलिंग एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी मुलांना टॉय ट्रेनचा आनंद घेता येऊ शकतो. हे सुंदर हिल स्टेशन पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे. दार्जिलिंगमधील चहाच्या बागा जगभर प्रसिद्ध आहे. या बागा बघण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेट देतात.
महाबळेश्वर – Family Vacation
महाराष्ट्रामधील महाबळेश्वर फॅमिली ट्रिपसाठी एक उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्ही मेप्रो गार्डन, एलिफंट पॉइंट इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतात. महाबळेश्वरमधील मेप्रो गार्डन हे मुलांसाठी मुख्य आकर्षण आहे. या ठिकाणी मुलांना मनसोक्त स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेता येतो. त्यामुळे तुम्ही जर फॅमिली ट्रीपला जाण्याचा विचार करत असाल, तर महाबळेश्वर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
चेन्नई – Family Vacation
सध्या उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे तुम्ही दक्षिण भारतातील चेन्नईला भेट देऊ शकतात. चेन्नईमध्ये समुद्रकिनारी तुम्ही तुमची सुट्टी निवांत साजरी करू शकतात. त्याचबरोबर चेन्नईमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहे, ज्यांना तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत भेट देऊ शकतात.
ओरछा – Family Vacation
तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ऐतिहासिक जागेला भेट देण्याचा विचार करत असाल, तर ओरछा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या ठिकाणी तुम्हाला अनेक ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतील. यामध्ये जहांगीर महाल, चतुर्भुज मंदिर, झाशीचा किल्ला इत्यादी स्थळांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ दाव्यावर अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “राजकीय द्वेषातून…”
- Konkan Teachers Constituency | कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी; प्रतिक्रिया देत म्हणाले…
- Shubhangi Patil | “मी लगेच आझाद मैदानावर…”; निकाल लागण्याआधीच शुभांगी पाटलांनी दिला आंदोलनाचा इशारा
- IND vs AUS | टीम इंडियासाठी खुशखबर! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये रवींद्र जडेजा करणार पुनरागमन
- Satyajeet Tambe | निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना धक्का; जवळच्या व्यक्तीचं अपघाती निधन