Satyajeet Tambe | निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना धक्का; जवळच्या व्यक्तीचं अपघाती निधन 

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या घडामोडींमुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेत राहिली आहे.  आज या निवडणुकीचा निकाल लागणार असून मतमोजणी सुरु झाली आहे. मात्र, या निवडणुकीत प्रमुख दावेदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना निकालापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे.

एकीकडे महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील आपल्या विजयचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे सत्यजीत तांबे यांच्या विजयाची खात्री दाखवत कार्यकर्ते जल्लोषाची तयारी करत आहेत. अशातच सत्यजित तांबे यांचा कार्यकर्ता आणि नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार (Manas Pagar) यांचे निधन झाले आहे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक येथे जात असताना हा अपघात झाला. नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर लोकांवर उपचार सुरु आहेत.

कोण आहेत मानस पगार?

मानस पगार हे काँग्रेस पक्षाचे नाशिकचे युवक जिल्हाध्यक्ष होते. पगार हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याने काँग्रेसची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडत असत. त्यामुळे पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. तर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर मानस पगार यांनी दीर्घकाळ केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती.

महत्वाच्या बातम्या :