Sanjay Raut | “चमचाभर हलवा सुद्धा मुंबईच्या हातावर…”; अर्थसंकल्पावरून संजय राऊतांची मोदी सरकारवर आगपाखड

Sanjay Raut | मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी ( १ फेब्रुवारी ) २०२३-२४ चा अर्थसंकल्प मांडला. त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदींचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. अर्थमंत्री सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

आगामी काळात म्हणजेच २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणउका जनतेच्या पैशांवर कशा लढवल्या जातील याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल सादर झालेला अर्थसंकल्प आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

ते म्हणाले, “मुंबईसह महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल देशाला मिळत असून, त्यातूनच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळालं? तर अर्थसंकल्पाआधी अर्थखात्यात दक्षिण ब्लॉगला बंद खोलीत हलवा करतात. तो चमचाभर हलवा सुद्धा मुंबईच्या हातावर मिळाला नाही.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मुंबईत वारंवार येत असून, अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या टोळधाडी येत आहेत. तर, उपमुख्यमंत्री मोठ मोठ्या घोषणा करत आहेत. मात्र, या सर्व घोषणा आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन केल्या जात आहेत. मोदी एका महिन्यात दोनवेळा मुंबईत येत आहेत. मात्र, येताना ते मुंबईसाठी काय आणतायेत? काय देत आहेत हा एक रहस्यमय विषय असल्याचे राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :