Rain Update | शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! देशात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडी (Cold) चा कडाका वाढला आहे, तर कुठे अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत पुढचे पंधरा दिवस देशाच्या बहुतांश भागांमध्ये कोरडे वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उत्तर भारतामध्ये बहुतांश भागात दिवसा तापमान 12 अंश सेल्सिअसच्या पलीकडे पोहोचू शकते. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट शेतीतील पिकांवर होत आहे. या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रामध्ये पुढील दोन ते तीन दिवस गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता देखील हवामान खात्याने दिली आहे. तर मुंबई, पुणे, अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूतील दक्षिण भागासह केरळमधील काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतील समुद्रकिनारी भागामध्ये आज हवामानाची परिस्थिती बिघडू शकते. या ठिकाणी अनेक भागात ताशी 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. त्याचबरोबर मध्य प्रदेशातही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसू शकतात.

हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि उत्तराखंडच्या बहुतांश भागांमध्ये वातावरणात बदल झाला आहे. या बदलत्या वातावरणामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी सोमवारपासून बर्फवृष्टि सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाले आहे. या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.