🕒 1 min read
Nilesh Rane | मुंबई : शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचं म्हाडाच्या वांद्रे येथील वस्तीत असणारं कार्यालय काल पाडण्यात आलं. त्याववरुन राजकारण तापलं आहे. संबंधित कार्यालय हे अनधिकृतपणे बांधण्यात आलं होतं. त्यामुळे म्हाडाने त्यावर हातोडा मारत कारवाई केली, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
मात्र, या सगळ्या घडामोडी नंतर अनिल परब काल म्हाडा कार्यालयात दाखल झाले. त्यांनी म्हाडा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अनिल परब तब्बल चार तास म्हाडा कार्यालयात होते. त्यानंतर ते कार्यालयाबाहेर आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी नोटीस बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील फैलावर घेत अनधिकृत जागेचा मालक मी आहे का?, असा सवाल केला. यावरून निलेश राणे यांनी ट्विट करत टीका केली आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1620653253829758978?s=20&t=NQ_aOeD6i3cwsi6PbPAVZw
अनधिकृत जागेचा मालक मी आहे का?? अनिल परबांचा अधिकाऱ्यांना सवाल. अनधिकृत जागेचा मालक पण असतो हा शोध अनिल परब यांनी लावला याबद्दल त्यांना १० कुत्र्यांची शेपूट वर करून सलामी”, अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे.
दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे यांची देखील अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. “अनिल परब हा मातोश्रीचा कारकून आहे. उद्धव ठाकरेंना स्वत:ला काही करण्याची हिंमत नाही. कारण तो नामर्द आहे. त्याला अनिल परबसारखे कारकून लागतातच”, अशा एकेरी भाषेत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane | “येत्या वर्षात भारताची अर्थव्यवस्था जर्मनी अन् जपानपेक्षा मोठी असेल” – नारायण राणे
- Narayan Rane | पेट्रोल, गॅस दरवाढीबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे नारायण राणे पत्रकारांवर भडकले; म्हणाले, “तुम्ही…”
- Jitendra Awhad | मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांना कोणत्याही क्षणी अटक होणार? नेमकं प्रकरण काय?
- Nitesh Rane | “परबांचं घर फक्त झाकी है, ‘मातोश्री’ टू अभी बाकी है” म्हणत राणेंची उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका
- Eknath Shinde | “हा अर्थसंकल्प गरीबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा”; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान, अर्थमंत्र्यांचं कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now