Nitesh Rane | “परबांचं घर फक्त झाकी है, ‘मातोश्री’ टू अभी बाकी है” म्हणत राणेंची उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका

Nitesh Rane | मुंबई :  शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांचे कार्यालय अनधिकृत असल्याचे सांगत पाडण्यात आले. त्यावरुन अनिल परब यांनी ‘20 वर्षांपूर्वीचं एक प्रकरण अजून म्हाडाकडे पेंडिंग आहे. किरीट सोमय्यांना माझं आव्हान आहे नारायण राणेंचं घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. माझ्यासोबत किरीट सोमय्या ती तोडक कारवाई बघायला येणार का?’ असे अनिल परब म्हणाले होते. त्यावरुन आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“अनिल परबांनी तारीख आणि वेळ कळवावी. आम्ही चहा तयार ठेवतो. त्यांनी उगाचच्या सुक्या धमक्या देवू नये. कोर्ट कोर्टाचं काम करेल. त्यांना एवढं सोपं वाटू नये आमच्या घरी येऊन धिंगाणा घालणे वगैरे ही काही ‘मातोश्री’ नाही कोणीही यावं आणि जावं. त्यांनी तारीख, वेळ कळवावी त्यांचं असं स्वागत करु की पुन्हा राणे साहेंबांच्या घराकडे फिरकणार नाहीत”, असे नितेश राणे म्हणाले आहेत.

“दुसऱ्यांची घरं पाडण्यासाठी तक्रारी देणाऱ्या लोकांबरोबर नियती कधी ना कधी असा खेळ करतेच. कधी राणे साहेबांचं घर तोडा, कधी कंगना रणावतचं घर तोडा, कधी दुसऱ्यांना अटक करायला लावा अनिल परब हा मातोश्रीचा कारकून आहे. उद्धव ठाकरेंना स्वत:ला काही करण्याची हिंमत नाही. कारण तो नामर्द आहे. त्याला अनिल परबसारखे कारकून लागतातच”, अशा एकेरी भाषेत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

Anil Parab | अनिल परब यांचे किरीट सोमय्यांना ओपन चॅलेंज; म्हणाले…

अनिल परबचं घर फक्त ‘झाकी है अभी मातोश्री टू बाकी है’ दुसऱ्या मातोश्रीवर जेव्हा हतोडा पडेल तेव्हा दिसेल. कारण त्यामध्ये सुद्धा खूप अनधिकृत गोष्टी आहेत. राणे साहेबांच्या घरावर तक्रार करण्याआधी तुझा जो बाप आहे उद्धव ठाकरे त्याच्या मातोश्री टूमध्ये जे आता नवीन तयार झालं आहे त्यामध्ये शिल्लक सेनेच्या शिवसैनिकांना एन्ट्री नाही”, असंही नितेश राणेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, ‘राज्यात आमचं सरकार आहे त्यामुळे सगळ सुरळित सुरु आहे. हिंदुत्ववादी विचारांचं सरकार चाललं आहे. आम्ही सरकार चालवत असल्याने कोणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. एवढी काळजी आम्ही घेवू’, असेही नितेस राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.