Budget 2023 | “बजेटमधून सामान्य माणूस हद्दपार…”; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची परखड टीका

Budget 2023 | नागपूर : केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी शेतकरी आणि सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. २०२४ च्या निवडणुकीपुर्वी मोदी सरकारकडून हे शेवटचे अर्थसंकल्प असेल. या बजेटवर विरोधकांकडून मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील अर्थसंकल्पाबाबत सवाल केला आहे.

“देशातील सामान्य गरीब माणसाला अर्थसंकल्पातून (Budget 2023) हद्दपार केलं आहे. देशात एकिकडे श्रीमंत अधिकच श्रीमंत होत चाललेत तर गरीब आणखीच गरीब होत चालले आहेत, याचं बॅलन्स कसं करणार?”, असा सवाल काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलाय.

उपेक्षित माणसाला प्रवाहाबरोबर आणण्याचं काम अर्थसंकल्पाद्वारे होणं अपेक्षित होतं, मात्र केंद्रीय अर्थसंकल्पाकडून देशाची निराशा झाली असल्याचं ते म्हणाले. ओबीसी हा देशाचा कणा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात 23 ओबीसी मंत्री आहेत. मात्र ओबीसींना 23 योजनापण दिल्या नाहीत, असंही वडेट्टीवार यांनी म्हंटल आहे.

विनायक राऊत यांची टीका

‘केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा आली आहे. तसेच भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलिअन करण्याबाबत अर्थमंत्र्यांनी कोणतंही वक्तव्य केले नाही’, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. “हे लोकसभा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे काही प्रमाणात सवलती देण्याचा प्रयत्न केला असला तरी एक घोर निराशा खासकरून मुंबईकरांच्या पदरी आली आहे. मुंबईत सातत्याने पंतप्रधान मोदी यांचं येणं-जाणं वाढलं असल्यामुळे मुंबईच्या विकासासाठी मोठं पॅकेज मिळेल, असं वाटलं होतं. पण मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात आलं आहे”, असे विनायक राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.