Budget 2023 । अर्थसंकल्पातील नवी कर रचना कशी असणार? किती रुपयाला किती टॅक्स लागणार?; वाचा सविस्तर 

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Budget 2023 । नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षापासून 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करातून सवलत मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करासंदर्भात नवीन संरचना जाहीर केली. नव्या करश्रेणीत 2.5 लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅब्जची संख्या 5 पर्यंत कम करण्यात आली आहे. त्यानुसार

3 लाखांपर्यंत – कोणताही कर नाही

3 ते 6 लाख – 5 टक्के

6 ते 9 लाख – 10 टक्के

9 ते 12 लाख – 15 टक्के

2 ते 15 लाख – 20 टक्के

15 लाखांहून जास्त – 30 टक्के

प्राप्तिकर सवलत मर्यादा 2.50 लाखांवरून 5 लाख करण्याची आवश्यकता आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मागील काही वर्षांपासून टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. सरकारने टॅक्स स्लॅब वाढवला तर करदाते वाचणाऱ्या पैशातून खरेदीकडे, गुंतवणुकीकडे वळतील. याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार असल्याचा अंदाज अर्थ तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी खास योजना 

अर्थसंकल्पात ‘महिला बचत सन्मान पत्र’ (Mahila Samman Saving Certificate) योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलांना 7.5 टक्के दराने परतावा मिळणार आहे. ही बचत योजना दोन वर्षांसाठी असणार आहे. किसान विकास पत्रप्रमाणे ही योजना असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 15 लाखांवरून 30 लाखांवर वाढवण्याची घोषणा केली आहे.

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलं जाणार असून दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून दिलं जाईल. 2 लाख रुपये एखादी महिला किंवा मुलीच्या नावे दोन वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा उपलब्ध असेल. काही प्रमाणात ही रक्कम काढण्याचीही परवानगी असेल

महत्वाच्या बातम्या :