Budget 2023 । ज्येष्ठ नागरिक अन् महिलांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ योजनेत करता येणार दुप्पट गुंतवणूक

Budget 2023 । नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Niramal Sitharaman) यांनी ज्येष्ठ नागरीक आणि महिलांसाठीच्या बचत योजनेबाबत (Saving Schemes) मोठी घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात ‘महिला बचत सन्मान पत्र’ (Mahila Samman Saving Certificate) योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलांना 7.5 टक्के दराने परतावा मिळणार आहे. ही बचत योजना दोन वर्षांसाठी असणार आहे. किसान विकास पत्रप्रमाणे ही योजना असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 15 लाखांवरून 30 लाखांवर वाढवण्याची घोषणा केली आहे.

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलं जाणार असून दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून दिलं जाईल. 2 लाख रुपये एखादी महिला किंवा मुलीच्या नावे दोन वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा उपलब्ध असेल. काही प्रमाणात ही रक्कम काढण्याचीही परवानगी असेल

तसेच पीएम आवास योजनेसाठीच्या तरतुदीत 66% टक्क्यांनी वाढून 79,000 कोटी एवढी असणार आहे. पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक 33% वाढून 10 लाख कोटी होणार आहे. पायाभूत सुविधांमधली तरतूद जीडीपीच्या 3.3% टक्के असणार आहे.

मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त

स्मार्टफोनमधील कॅमेरा लेंसच्या सीमा शुक्लात २.५ टक्क्यांनी कपात केली. तसेच, एलईडी टीव्हीच्या सीमा शुक्लातही २.५ टक्क्यांनी कपात करण्यात आल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. शेतीसाठी डिजिटल पायाभूत सुविधांना चालना, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न, क्षमतांचा पूर्ण वापर, शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करण्याचे प्रयत्न, आर्थिक क्षेत्र आणि युवक विशेष लक्ष यावर अधिक भर दिला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या :

Back to top button