#Budget_2023 | अर्थसंकल्प सादर करताना सत्ताधाऱ्यांच्या ‘मोदी मोदी’ घोषणांना विरोधकांकडूनही घोषणेने प्रत्युत्तर

#Budget_2023 | नवी दिल्ली : आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अनेक विविध घोषणा निर्मला सीतारमण यांच्याकडून केल्या जात असताना सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना संसदेत पाहण्यास मिळाला. काही लोकप्रिय घोषणा केली की सत्ताधारी बाकं वाजवून ‘मोदी-मोदी’च्या घोषणा करत होते. या घोषणांना विरोधकांनी प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

अर्थसंकल्पाच्या सुरूवातीलाच या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येकवेळी जेव्हा सत्ताधाऱ्यांनी ‘मोदी मोदी’ घोषणा दिल्या त्यावेळी त्यांना विरोधक ‘भारत जोडो, भारत जोडो’ या घोषणांनी उत्तर देत आहेत हे पाहण्यास मिळत आहे.

संसदेत सलग पाचव्यांदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे अमृत काळातलं बजेट आहे असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. अशात त्यांनी अर्थसंकल्पातल्या तरतुदी सांगितल्यानंतर ‘मोदी मोदी’ घोषणा केल्या. त्या घोषणांना विरोधकांनी ‘भारत जोडो, भारत जोडो’ घोषणांनी उत्तर दिल्याचे पाहायला मिळालं आहे.

राहुल गांधी यांनी  ‘भारत जोडो’ यात्रेचा समारोप 30 जानेवारीला म्हणजेच महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी केला. भारत जोडो यात्रेने देशाला प्रेमाचा आणि आपुलकीचा मार्ग दाखवला आहे आणि काँग्रेसला तिरस्कार संपवून देशात आपुलकी आणि प्रेम परत आणायचं आहे. लोकांलोकांमध्ये वाढलेली दुही संपवायची आहे. ‘मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ’ असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

’12 राज्यांमधून ही यात्रा गेली. 7७ सप्टेंबर 2022 ला सुरू झालेली ही यात्रा 30 जानेवारी 2023 रोजी संपली. या यात्रेचा प्रभाव देशभरात पडला आहे. आम्ही ही यात्रा काँग्रेस पक्षासाठी नाही तर देशासाठी काढली होती’ असंही त्यांनी सांगितलं. याच ‘भारत जोडो’ यात्रेचा उल्लेख घोषणा म्हणून संसदेत करण्यात आला.

काय म्हणाल्या निर्मला सीतारमण?

अमृत काळातला हा अर्थसंकल्प मी सादर करते आहे असं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. त्यानंतर काही लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या तेव्हा मोदी मोदीच्या घोषणा सत्ताधाऱ्यांनी दिल्या. त्यावेळी विरोधकांनी भारत जोडो, भारत जोडो या घोषणा दिल्या.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.