Bangalore Tour Guide | बंगळूरूला भेट देण्याचा विचार करत असाल, तर ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

Bangalore Tour Guide | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटकची राजधानी असलेले बंगळूरू हे एक अतिशय सुंदर शहर आहे. या शहराला सिलिकॉन व्हॅली असे देखील म्हणतात. बंगळुरूमध्ये नेहमी अल्हाददायक वातावरण असते. त्यामुळे पर्यटक फिरण्यासाठी बेंगळुरूला प्राधान्य देतात. त्यामुळे तुम्ही पण जर बेंगळुरूला फिरायला जाण्याची योजना आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बंगळूरूमधील काही आकर्षक ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत.

नंदी हिल्स

नंदी हिल्स हे ठिकाण बंगळुरूचे मुख्य आकर्षण आहे. या ठिकाणी तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबीयांसोबत जाऊ शकतात. या ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. त्यामुळे तुम्ही जर बंगळूरूला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही नंदी हिल्सला नक्कीच भेट दिली पाहिजे.

स्नो सिटी

स्नो सिटी हे बंगळुरूमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. स्नो सिटी हा एक थीम पार्क आहे. या पार्कमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी करायला मिळतील. या ठिकाणी तुम्ही 45 मिनिटांमध्ये अनेक ॲक्टिव्हिटी करू शकतात. इथे तुम्ही स्नो फॉलचा आनंद घेऊ शकतात.

बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यान

बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानामध्ये तुम्हाला सामान्य वन्य प्राण्यांव्यतिरिक्त अनेक दुर्मिळ प्राणी बघायला मिळतील. या ठिकाणाला भेट द्यायला देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. इथे तुम्हाला हत्ती, पॅंथर, कोल्हे, कोब्रा, सरडे आणि इतर अनेक वन्यजीव आणि पक्षांच्या प्रजाती बघायला मिळतील. या ठिकाणी तुम्ही जंगल सफारीचा देखील आनंद घेऊ शकतात.

मायक्रोलाइट फ्लाइंग

तुम्हाला जर अॅडवेंचर ॲक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्ही मायक्रोलाइट फ्लाइंगला नक्की भेट दिली पाहिजे. हे ठिकाण सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत सुरू असते. या ठिकाणी तुम्हाला विमानात बसण्याची संधी मिळेल. तज्ञ वैमानिकांसह तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं या ॲक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.