Cold Wave Update | राज्यात थंडीची लाट कायम, हवामान विभागाचा इशारा

Cold Wave Update | टीम महाराष्ट्र देशा: उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीची लाट कमी झाली होती. मात्र, पुढील दोन दिवस राज्यात पुन्हा थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढच्या 48 तासात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे.

लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाला आहे. त्याचा परिणाम राज्यातील काही जिल्ह्यांवर झाला आहे. राज्यात बहुतांश शहरांमध्ये किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या बदलत्या  वातावरणामुळे शेतीतील पिकांवर धोका निर्माण झाला आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

मध्य महाराष्ट्रासह पुण्यामध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. मुंबईत देखील किमान तापमान सरासरी पेक्षा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही थंडीचा कडाका कायम राहणार आहे. राज्यातील इतर भागात थंडीचा जोर 26 जानेवारीपर्यंत कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र, नवीन माहितीनुसार राज्यात पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळे वातावरण आहे. कुठे थंडीची लाट पाहायला मिळत आहे. तर कुठे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतीतील गहू, हरभरा, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button