Urfi Javed | ऐन वेळी कपडे खराब झाल्यावर तुम्ही काय करता? पाहा उर्फीनं काय केलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Urfi Javed | मुंबई: सोशल मीडिया सेन्सेशन आणि फॅशन आयकॉन उर्फी जावेद नेहमी तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या या विचित्र फॅशनमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या या विचित्र फॅशनमुळे तिच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेत उर्फीला नोटीस बजावली होती. पण ऐकेल ती उर्फी कसली? उर्फी पुन्हा एकदा तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

उर्फी मुंबईच्या रस्त्यांवर जेव्हा कारमधून उतरली, तेव्हा तिची विचित्र फॅशन पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. उर्फीने चक्क जीन्स पॅन्ट अंगभर परिधान केलेली होती. तिच्या या विचित्र फॅशनवर काय प्रतिक्रिया द्यावी, असा प्रश्न रस्त्यावरील लोकांना पडला असेल. तिला जेव्हा या फॅशनबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “मला जो ड्रेस घालायचा होता तो ऐनवेळी खराब झाल्यामुळे मी हा लुक करून आले आहे.” उर्फीचा हा लुक बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहे.

उर्फीच्या विचित्र फॅशनमुळे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. उर्फीने तिचा हा प्रकार बंद केला नाही तर मी तिला थोबाडेल, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी तिला इशारा दिला होता. त्यानंतर या दोघींमध्ये चांगलाच वादविवाद सुरू झाला होता. त्यांचा हा वाद राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचला होता.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या तक्रारीनंतर उर्फी त्यांना सतत डिवचत होती. उर्फी ट्विट करत चित्रा वाघ यांना म्हणाली होती, “उर्फी की अंडरवेअर मे, छेद हे चित्रा ताई ग्रेट है.” इतकंच नव्हे तर तिने या कॅप्शन शेजारी तीन रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केले होते. यापूर्वी तिने पोस्ट करत चित्रा वाघ यांना सासू म्हटले आहे. ती ट्विट करत म्हणाली होती, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू.”

महत्वाच्या बातम्या