Rain Update | पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रासह ‘या’ ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा, पाहा हवामान खात्याचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अवकाळी पावसाची (Rain) शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यात पुढील दोन दिवस साम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट (Cold Wave) कायम राहणार आहे. या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. आधीच वाढत्या थंडीमुळे आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला होता. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळे वातावरण आहे. कुठे थंडीची लाट पाहायला मिळत आहे. तर कुठे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतीतील गहू, हरभरा, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होणार आहे.

राज्यात 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट कायम असणार आहे. या लाटेचे प्रमाण मध्य महाराष्ट्रात अधिक असणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील किमान तापमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्याच्या रब्बी हंगामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या