Sheetal Mhatre | “राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले, त्यांना उपचाराची गरज आहे”; शीतल म्हात्रेंचा पलटवार

Sheetal Mhatre | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड पुकारला आणि गुवाहाटीला निघून गेले होते. त्यावेळी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. यावरुन ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्यावेळी ठाकरे गटात असताना शीतल म्हात्रे यांनी एका भाषणात बोलताना ‘जे पळून गेले त्यांच्या पार्श्वभागावर फटके द्या’ असे म्हणाल्या होत्या.

शीतल म्हात्रे यांनी एका भाषणात असे वक्तव्य केले आणि नंतर त्याच गुवाहटीला जाऊन मिळाल्या. त्यावरुन संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना शीतल म्हात्रे यांच्या भाषणाचा संदर्भ देत शिंदे गटावर टीका केली. राऊतांच्या टीकेनंतर आता शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे, असा पलटवार शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केलाय.

पुढे त्या म्हणाल्या, “आज महाज्ञानी, महावक्ता संजय राऊत यांनी एक आकाशवाणी केली. मी शीतल म्हात्रे मागील १८ वर्षांपासून कट्टर शिवसैनिक आहे. संजय राऊत म्हणाले की माझ्या वक्तव्यामुळे ४० आमदार गुवाहाटीला गेले. हसावे की रडावे हेच मला समजत नाही. मी आमदार नाही किंवा खासदारही नाही. मी फक्त एक माजी नगरसेवक आहे. माझ्या बोलण्याला घाबरून आमदार पळून गेले, असे म्हणणे लहान मुलांनाही पटणारे नाही.”

संजय राऊत काय म्हणाले होते?

“जे पळून गेले त्यांना लाठ्या मारा, दंडुक्याने बडवून काढा असे भाषण अलिबागच्या सभेत त्यांच्या गटात असणाऱ्या शीलत म्हात्रे यांनीच केले आहे. त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की, नक्की ते शिवसेना का सोडून गेले? मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की, महाविकास आघाडी नको म्हणून गेले, हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले, की खोके मिळाल्यामुळे सोडून गेले हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं. ते आपली भूमिका दरवेळी बदलतात”, असे संजय राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :