Pankaja Munde | “काही लोकांनी माझ्या नावावर लागलेल्या पाट्या रंगवून..”; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

Pankaja Munde | मुंबई : धनंजय मुंडे यांचा 3 जानेवारीला रात्री भीषण अपघात (Dhananjay Munde Accident) झाला होता. अपघातात जखमी झालेल्या आपल्या भावाची पंकजा मुंडे यांनी भेट घेतल्याची घटना ताजी असतानाच, आता त्याच पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. परळी येथील एका मंदिराच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘काही … Read more

Published On: 

Pankaja Munde | मुंबई : धनंजय मुंडे यांचा 3 जानेवारीला रात्री भीषण अपघात (Dhananjay Munde Accident) झाला होता. अपघातात जखमी झालेल्या आपल्या भावाची पंकजा मुंडे यांनी भेट घेतल्याची घटना ताजी असतानाच, आता त्याच पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

परळी येथील एका मंदिराच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘काही लोकांनी माझ्या नावावर लागलेल्या पाट्या रंगवून स्वतःचं नाव टाकलं’ असल्याचं पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.

“मी हे केलं ते केले असं मला कधी मोजायची सवय नाही. लोकांनी तर माझ्या कामावर, माझ्या निधीवर  बदलून स्वतःचे नावं टाकले असेही मला बघायला मिळाले. पण अशा चिल्लर गोष्टी करायची मला गरज, नसून मुंडे साहेबांनी मला असे कधी शिकवलं नाही,” असा टोलाही पंकजा मुंडे यावेळी लगावला आहे.

त्यांच्या या वक्तव्यांनंतर पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या या विधानावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) काय प्रत्युत्तर देतात का? हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही