Chandrakant Khaire | “बाप तैसा बेटा, भरलो…”; शिंदे गटाची खैरे पिता-पुत्रांवर बोचरी टीका
Shivsena | औरंगाबाद : औरंगाबादचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र माजी नगरसेवक आणि युवासेनेचे पदाधिकारी ऋषिकेश खैरे हे एका ऑडिओ क्लिप प्रकरणावरून वादात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली करून देण्यासाठी एक व्यक्तीकडून त्यांनी दोन लाख रुपये घेतल्याचे या ऑडिओ क्लिपमधून उघड होत आहे. मात्र संबंधित व्यक्तीचे काम न झाल्याने तो व्यक्ती आता ऋषिकेश खैरेंकडे पैसे परत करण्याची मागणी करत आहे.
या प्रकरणावरून आता भाजप शिंदे गटाने चंद्रकांत खैरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली आहे. या प्रकरणावरून आता भाजपा आणि शिंदे गटाने चंद्रकांत खैरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली आहे. शिंदे गटाचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी खैरे पिता-पुत्रावर टीका केली आहे.
“एखाद्या कार्यकर्त्यांनी जर चार चाकी वाहन घेतले किंवा चांगले मोठे घर घेतलं तर त्याच्याकडे संशयाने पाहणारे चंद्रकांत खैरे आता यावर काय उत्तर देतील? यावरून एक गोष्ट लक्षात आली जे आडात आहे तेच पोहऱ्यात आले. युवा सैनिक घडवण्याची जबाबदारी असणारा पदाधिकारी खऱ्या अर्थाने युवकांना काय आदर्श देणार? हा एक चर्चेचा विषय ठरतो” असंही राजेंद्र जंजाळ यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Keshav Upadhye | “महाविकास आघाडीच्या गृहमंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं”; सुळेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला केशव उपाध्येंचं प्रत्युत्तर
- Chandrashekhar Bawankule | “हे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण”; प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचा पलटवार
- #BigNews | आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा; 2013 मधील बलात्कार प्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाचा निर्णय
- Panjab Food | पंजाबला भेट देण्याचा विचार करत असाल, तर ‘या’ पदार्थांचा नक्की घ्या आस्वाद
- MPSC New Syllabus | मोठी बातमी! MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार