Chandrashekhar Bawankule | “हे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण”; प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचा पलटवार

Chandrashekhar Bawankule | मुंबई : बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध करण्यात आला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर सडकून टीका केली.

प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानानंतर राजकीय पातळीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत विक्षिप्तपणाने वक्तव्य केलेले आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबाबत जे बोलले ते मानसिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.”

“आमच्या नेतृत्त्वावर टीका टिप्पणी केली तर राज्यभरात निषेध व्यक्त करावा लागेल. अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे, त्याचा उद्रेक होईल”, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिलाय.

नेमकं काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

ते म्हणाले, “देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने या देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय, अशी परिस्थिती आहे. आगामी कालावधीत ही भीती आपल्याला दूर करायची आहे.”

महत्वाच्या बातम्या :

Back to top button