MPSC New Syllabus | मोठी बातमी! MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

MPSC New Syllabus | पुणे : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळालाअसून थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. यावेळी फडणवीस यांनी हा विषय आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल आणि निर्णय घेऊ अशी आश्वासन दिलं होतं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून मान्यता मिळाल्याची माहिती आहे.

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करावा अशी मागणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात होती. या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू होते. दरम्यान, राज्य सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. पुण्यात विद्यार्थ्यांनी गोपीचंद पडळकर यांना उचलून घेत त्यांच्या नावाचा जयजयकार केला. सरकारच्या या निर्णयावर पडळकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “आज विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या भावना सरकारने ऐकल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातील एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आनंदात आहेत. मात्र या निर्णयामुळे ज्यांना पोटशूळ उठला आहे, त्यांना रडत बसूद्या. त्याला पर्याय नाही,” असे पडळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :