Adventure Trip Guide | ॲडवेंचर्स ॲक्टिव्हिटी करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर

Adventure Trip Guide | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. या महिन्यामध्ये पर्यटक फिरायला (Travel) जाण्यासाठी बाहेर पडत असतात. कारण फेब्रुवारीतील वातावरण फिरण्यासाठी अतिशय योग्य असते. या महिन्यात हवामान अधिक उष्ण आणि थंडही नसते. त्यामुळे या महिन्यात फिरायला जाण्याची मजा वेगळीच असते. आजकाल फिरायला जाण्यासोबतच ॲडवेंचर्स ॲक्टिव्हिटी ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, बलून राईड, बंजी जम्पिंग इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. तुम्हीपण यापैकी कुठली ॲक्टिव्हिटी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही योग्य बातमी वाचत आहात. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला बेस्ट ॲडवेंचर्स ॲक्टिव्हिटी प्लेसेस बद्दल माहिती सांगणार आहोत. ॲडवेंचर्स ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

ऋषिकेश

तुम्ही जर रिव्हर राफ्टिंग, बंजी जम्पिंग इत्यादी गोष्टी करण्याचा विचार करत असाल, तर ऋषिकेश तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ऋषिकेशमधील व्हाईट रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी देशासह विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेट देतात. ऋषिकेशमध्ये तुम्ही ॲडवेंचर्स ॲक्टिव्हिटीसोबतच निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात.

धर्मशाळा

तुम्हाला जर ट्रेकिंग आणि रॅपलिंगची आवड असेल, तर तुम्ही धर्मशाळेला जाऊ शकतात. हे ठिकाण हिमालय पर्वतरांगेंनी वेढलेले आहे. धर्मशाळा समुद्रसपाटीपासून 9350 फूट उंचीवर आहे. तुम्ही जर ट्रेकिंग प्रेमी असाल, तर धर्मशाळा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

जयपुर

राजस्थानमधील जयपूर शहर बलून रायडींगसाठी प्रसिद्ध आहे. या शहराला पिंक सिटी असेही म्हणतात. हे शहर आपल्या राजेशाही थाटासाठी ओळखले जाते. जयपुरमध्ये तुम्ही राजवाडे, तलाव इत्यादी गोष्टी एक्सप्लेअर करू शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही हॉट बलून रायडींगचा आनंद घेऊ शकतात.

खज्जीयार

खज्जीयार हे ठिकाण हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात स्थित आहे. हे गाव पूर्णपणे डोंगरांनी वेढलेले आहे. हे ठिकाण पॅराग्लाइडिंग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. खज्जीयारमध्ये पॅराग्लाइडिंग करण्यासाठी देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या ठिकाणी तुम्हाला पॅराग्लाइडिंगसोबत हिमालयाचे उत्कृष्ट नजारे बघायला मिळतील.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.