Sanjay Raut | “जे पळून गेले त्यांचा पार्श्वभाग सुजवून काढा असं म्हणणाऱ्याच गुवाहाटीला जाऊन मिळाल्या”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड पुकारला आणि गुवाहाटीला निघून गेले होते. त्यावेळी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. यावरुन ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्यावेळी ठाकरे गटात असताना शीतल म्हात्रे यांनी एका भाषणात बोलताना ‘जे पळून गेले त्यांना दंडुक्याने मारा. त्यांच्या पार्श्वभागावर फटके द्या’ असे शीतल म्हात्रे म्हणाल्या होत्या.

शीतल म्हात्रे यांनी एका भाषणात असे वक्तव्य केले आणि नंतर त्याच गुवाहटीला जाऊन मिळाल्या. त्यावरुन संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना शीतल म्हात्रे यांच्या भाषणाचा संदर्भ देत शिंदे गटाला आव्हान दिले आहे.

“जे पळून गेले त्यांना लाठ्या मारा, दंडुक्याने बडवून काढा असे भाषण अलिबागच्या सभेत त्यांच्या गटात असणाऱ्या शीलत म्हात्रे यांनीच केले आहे. त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की, नक्की ते शिवसेना का सोडून गेले? मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की, महाविकास आघाडी नको म्हणून गेले, हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले, की खोके मिळाल्यामुळे सोडून गेले हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं. ते आपली भूमिका दरवेळी बदलतात”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

धमकीचा विषय आत्ता आलाय. ते माझ्या ज्या भाषणाचा उल्लेख करत आहेत, ते माझं भाषण सुरतवरुन गुवाहाटीला पोहचल्यावर केलेलं भाषण आहे. शिवसेनेच्या मंचावरुन शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी केलल्या भाषणात पळून जाणाऱ्यांचा पार्श्वभाग सुजवा अस म्हणाल्या आणि परत जाऊन गुवाहाटीला मिळाल्या. त्यांचे हे वैफल्य आहे की, निवडणूक आयोग असो किंवा सर्वोच्च न्यायलय असेल प्रत्येक लढाई ते हरणार आहेत”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी बोलताना ‘फालतू लोकांवर बोलायला मी बांधिल नाही. आमची भुमिका आम्ही काल स्पष्ट केली आहे’ असे म्हणत संजय राऊत यांनी संजय गायकवाड यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या