Bachhu Kadu | धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार अन् मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?; बच्चू कडू म्हणाले…

Bachhu Kadu | नागपूर : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे.

यावर प्रहारचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार असल्याचं ते म्हणालेत. आमदार, खासदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांची संख्या ही शिंदे गटाकडे जास्त आहे. यापूर्वी धनुष्यबाणासंदर्भात जे निर्णय आले त्याचा विचार करता शिंदे गटाकडेच धनुष्यबाण जाणार असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी विचारणा करण्यात आल्यानंतर “धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळेच मंत्रीमंडळविस्तार रखडला आहे. ही सुनावणी पार पडल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे”, असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती महाविकास आघाडी आणि शिंदे गट अशा दोन्हीकडे आहे. सत्ताधाऱ्यांसाठी न्यायालयीन प्रकरणामुळे अडचण निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मोठा उठाव झाला आणि शिंदे गट निर्माण झाला. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात लवकर राजकीय स्थिरता यावी, अशी आमची इच्छा आहे.”

महत्वाच्या बातम्या :