Salil Kulkarni | म्हणजे पुण्यात मूर्ख काय सगळे? सलील कुलकर्णी म्हणतात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Salil Kulkarni | टीम महाराष्ट्र देशा: प्रसिद्ध गायक आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या गाणी आणि संगीताचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सलील कुलकर्णी यांनी ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट निर्माण केले आहे. सलील कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असतात. त्यांनी नुकतीच एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी संत रामदास स्वामी यांचा अभंग पोस्ट केला आहे.

सलील कुलकर्णी यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये समर्थ रामदासांचा अभंग पोस्ट केला आहे. सलील कुलकर्णी यांनी “आदरेंविण बोलणें | न पुसतां साक्ष देणें !
निंद्य वस्तु अंगीकारणें | तो येक मूर्ख!!”

हा संत रामदास स्वामी यांचा अभंग शेअर केला आहे.

सलील कुलकर्णी यांच्या या पोस्टवर वापरकर्ते वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहे. यामध्ये एक युजर  कमेंट करत म्हणाला, “म्हणजे पुण्यात मूर्ख काय सगळे”. त्याच्या या कमेंटवर प्रतिक्रिया देत सलील कुलकर्णी म्हणाले, “सोशल मीडियावर बहुतेक सगळे आहेत”. यावरून सलील कुलकर्णी यांनी या प्रतिक्रियेच्या माध्यमातून सगळ्या पुणेकरांना मूर्ख म्हटल्याचा, अंदाज बांधला जात आहे.

म्हणजे पुण्यात मूर्ख काय सगळे ? सलील कुलकर्णी म्हणतात
म्हणजे पुण्यात मूर्ख काय सगळे ? सलील कुलकर्णी म्हणतात

प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी हे नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करत असतात. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सलील कुलकर्णी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सलील कुलकर्णी वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडत असतात. अशात सलील कुलकर्णी यांनी फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट चर्चेचं कारण ठरली आहे.

महत्वाच्या बातम्या