Travel Tips | फेब्रुवारी महिन्यात फिरायला जाण्यासाठी ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम

Travel Tips | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिन्यातील वातावरण (Weather) फिरण्यासाठी अतिशय योग्य असते. कारण या महिन्यात वातावरण जास्त थंड आणि जास्त उष्णही नसते. त्यामुळे पर्यटक या महिन्यात फिरायला जाण्यासाठी बाहेर पडत असतात. तुम्ही पण फेब्रुवारी महिन्यात फिरायला जाण्याची प्लॅनिंग करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात फिरण्यासाठी काही ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. फेब्रुवारी महिन्यात तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

जैसलमेर

राजस्थानमधील जैसलमेर फेब्रुवारी महिन्यात भेट देण्यासाठी एक अतिशय उत्तम ठिकाण आहे. या महिन्यात जेसलमेरमध्ये तुम्ही उंट सफारीचा आनंद घेऊ शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला राजस्थानची परंपरा आणि संस्कृती बघायला मिळेल. फेब्रुवारी महिन्यातील वातावरण जैसलमेरला भेट देण्यासाठी अतिशय उत्तम आहे.

कोहिमा

तुम्ही जर भारताच्या नॉर्थ-ईस्ट भागात फिरायला जाण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही कोहिमाला नक्की भेट दिली पाहिजे. कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. या शहरामध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. या ठिकाणी तुम्ही जप्पू पीक, जुको व्हॅली, कोहिमा व्हिलेज इत्यादी गोष्टी बघू शकतात.

जयपुर

पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेले जयपूर शहर फेब्रुवारी महिन्यात फिरण्यासाठी अतिशय उत्तम आहे. या महिन्यात जयपुरमध्ये वातावरण अतिशय अल्हाददायक असते. त्यामुळे तुम्ही जयपुरमध्ये तुमची सुट्टी निवांत साजरी करू शकतात.

ओरछा

ओरछा हे ठिकाण फेब्रुवारीमध्ये फिरायला जाण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. बेटवा नदीच्या काठी ओरछा शहर वसलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक आकर्षक ठिकाणं बघायला मिळतात. या ठिकाणी तुम्ही जहागीर महाल, राज महाल, रॉय प्रवीण महाल, फुलबाग इत्यादी प्रमुख ठिकाणांना भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या