Sayali Sanjiv | वाढदिवस ऋतुराज गायकवाडचा अन् सेलिब्रेशन केलं सायली संजीवनं

Sayali Sanjiv | पुणे: भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आज त्याचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशात अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjiv) ने सोशल मीडियावर केक कट करतानाचे फोटो शेअर केला आहे. यानंतर सायलीने ऋतुराजचा वाढदिवस साजरा केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर सायलीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे आज अभिनेत्री सायली संजीवचाही वाढदिवस आहे. अशात तिने केक कट करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यानंतर सायलीने ऋतुराजच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर चांगल्या रंगल्या आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सायली आणि ऋतुराज यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहे.

ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव यांच्या रिलेशनशिपबाबत सतत चर्चा सुरू असतात. ऋतुराजने सायलीच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट केली होती. सायलीने लगेच त्याच्या कमेंटला प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधान आलं होतं.

काही दिवसांपूर्वी सायली आणि ऋतुराज एकमेकांना डेट करत असलेल्या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता. त्यावेळी सायलीने मोठा खुलासा केला होता. ती म्हणाली होती, “जेव्हापासून आमच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या आहे, त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. या चर्चांमुळे आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.”

महत्वाच्या बातम्या