Eknath Shinde | “राऊतांच्या धमकीमुळे शिवसेनेचे आमदार पळून गेले”; शिंदे गटाच्या लेखी युक्तीवादात मोठा दावा

Eknath Shinde | मुंबई : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी खळबळजनक माहिती आता समोर आली आहे. शिवसेनेच्या ‘पक्ष’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्याप्रमाणे ठाकरे आणि शिंदे गटाने आपले लेखी म्हणणे निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे.

शिंदे गटाने अगदीच शेवटच्या मिनिटाला मांडलेल्या लेखी भूमिकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटाकडून आज केंद्रीय निवडणूक आयोगात तब्बल 124 पानांचे लेखी उत्तर सादर करण्यात आले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.

“संजय राऊत यांच्या धमकीमुळे आमदार पळून गेले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाच्या आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांना धोका निर्माण झाला. संजय राऊत यांच्या धमकीची दखल सर्वोच्च न्यायालयाने आमदार आणि कुटुंबियांना सुरक्षा पुरवावी असे सरकाराला सांगितले होते”, असा उल्लेख लेखी युक्तिवादात करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

“एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतापद हे घटनात्मक आहे. ही बाजू आम्ही संपूर्णत: निवडणूक आयोगासमोर मांडलेली आहे. संविधानानुसार आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जी प्रक्रिया आहे, ती पार पाडून, त्याची अंमलबजावणी करुन घटनात्मक ते पद निर्माण करण्यात आले आहे. ही सर्व कायदेशीर बाजू आम्ही निवडणूक आयोगाकडे मांडलेली आहे”, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button