Sharad Pawar | शरद पवारांची ती एक भेट अन् लोकसभा पोटनिवडणूक रद्द; ‘या’ खासदारावरील बडतर्फीची कारवाई मागे!

NCP | नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. केरळ सत्र न्यायालयाने 2009 च्या एका खुनी हल्ल्याच्या प्रकरणात मोहम्मद फैजल यांना दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने 2013 च्या कायद्याचा आधारे मोहम्मद फैजल यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली होती.

मोहम्मद फैजल यांच्यावर केलेल्या कारवाई संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यावर करण्यात आलेल्या बडतर्फीच्या कारवाईसंदर्भात शरद पवार यांनी ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे.

मोहम्मद फैजल हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. शरद पवार यांनी यासाठी केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला आहे. शरद पवार यांनी ओम बिर्ला यांच्या भेटीत मोहम्मद फैजल यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे घेण्याची मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे. “केरळ उच्च न्यायालयाने मोहम्मद फैजल यांना सुनावण्यात आलेली शिक्षा रद्द केली असल्याचे लोकसभा अध्यक्षांना निलंबनाच्या कारवाईचा फेरविचार व्हावा”, अशी विनंती देखील शरद पवार यांनी केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

केरळ सत्र न्यायालयात दोषी ठरल्यानंतर मोहम्मद फैजल यांच्यावर लोकसभा सचिवालयाकडून बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती.  फैजल यांच्या बडतर्फीनंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. शरद पवार आणि ओम बिर्ला यांच्यातील भेटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक रद्द केली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.