Satyajeet Tambe | नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज(सोमवार) मतदान सुरू आहे. यामध्ये औरंगाबाद, नागपूर व कोकण या शिक्षक मतदारसंघांचा आणि नाशिक व अमरावती या पदवीधर समावेश आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या जागेवरील अपक्ष उमदेवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. अखेर त्यांनी यामागचं नेमकं कारण स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, “उमेदवारी अर्ज दाखल करताना इंडियन नॅशनल काँग्रेसचाच फॉर्म भरलेला आहे. तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म जोडू शकलो नाही. म्हणून उमेदवारी अर्ज अपक्षात कन्व्हर्ट झालेला आहे.”
अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचं जे दाखवलं जातंय ते चुकीचं असल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले. पदवीधरच्या निवडणुकीचा नियम असं सांगतो की, वेळेत फॉर्म भरला तरच पक्ष उमेदवारी ग्राह्य धरली जाते. फॉर्म भरताना इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणूनच फॉर्म भरला. मात्र वेळेवर फॉर्म सबमिट होऊ न शकल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली.
अपक्ष उमेदवारी बाबत बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय? त्यावर तांबे म्हणाले की, ते आजारी असून त्यांच्या खांद्यावर ऑपरेशन झालेलं आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बाळासाहेब थोरात हे आमचे कुटूंबप्रमुख असून योग्य वेळ आल्यावर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Radhakrishna Vikhe Patil | “घरोबा एकाबरोबर अन् संसार…”; विखे-पाटलांचा महाविकास आघाडीला टोला
- Satyajeet Tambe | “मी तर अपक्ष उमेदवार अन्…”; सत्यजीत तांबेंचं मतदानानंतर स्पष्ट वक्तव्य
- Solo Trip | सोलो ट्रिप करायचा विचार करत असाल, तर करा ‘ही’ सुंदर ठिकाणं एक्सप्लोर
- Murali Vijay | टीम इंडियाचा माजी सलामीवीर मुरली विजयने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- Satyajeet Tambe | “विजय अगोदरच झालेला आहे, आता फक्त…”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य