Share

Satyajeet Tambe | “विजय अगोदरच झालेला आहे, आता फक्त…”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य

🕒 1 min read Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. “ही निवडणूक … Read more

Published On: 

🕒 1 min read

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

“ही निवडणूक एकतर्फी कशी ते तुम्हाला निकालातून दिसेल. विजय अगोदरच झालेला आहे, आता फक्त उत्सुकता एवढीच आहे की मताधिक्य किती होतं. मतदान किती जास्तीत जास्त होतं, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे”, असं सत्यजीत तांबेंनी म्हटलं आहे.

ज्या पद्धतीने या मतदारसंघात मागील १४ वर्षे माझ्या वडिलांनी प्रतिनिधत्व केलं. एकंदरीतच या पाचही जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीचा ऋणानुबंध त्यांनी इथल्या सामान्य जनतेशी, मतदारांशी निर्माण केला. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

“मी लवकरच गेल्या काही दिवसातील घडामोडी घडल्या त्या येत्या काही दिवसांत सांगेन. काँग्रेसमधील काही लोकांकडून आमच्या परिवारावर आरोप करण्यात आले. त्यांच्याबद्दल मी काही दिवसांत सांगेन” असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “सगळ्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पक्षीय भेदाभेद विसरून माझ्यासोबत आहेत. याचं कारण, आम्हीदेखील निवडणुकीपुरतं फक्त राजकारण करत असतो, निवडणुकीनंतर आमच्या परिवाराने एक पथ्यं कायम पाळलेलं आहे आणि ती परंपरा आमच्या परिवाराची आहे, की आम्ही सातत्याने सामान्य लोकांच्या कामासाठी तातडीने कामाला लागत असतो.”

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या