Government Scheme | सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांच्या लहान-मोठ्या समस्या सोडवणार, जाणून घ्या सविस्तर

Government Scheme | टीम महाराष्ट्र देशा: भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशातील कृषी क्षेत्र दिवसेंदिवस प्रगत होत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. कारण अनेकदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागते. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहे. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना. सरकारने 2006 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत गारपीट, पूर, ढगफुटी, नैसर्गिक आग, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस इत्यादी गोष्टींमुळे पिकाचे नुकसान झाल्यास मदत दिली जाते.

तुम्ही जर पीक विमा योजना अंतर्गत अनुसूचित पिकांची लागवड केली असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळू शकतो. या योजनेमध्ये भाडेकरू शेतकऱ्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेमध्ये तृणधान्य, कडधान्य, तेल बिया आणि काही व्यावसायिक पिकांचा समावेश आहे. पीएम फसल विमा योजना ही जगातील तिसरी आणि सर्वात यशस्वी योजना आहे.

प्रत्येक राज्यामध्ये पीएम फसल किसान योजनेची नोंदणी करायची तारीख वेगळी असते. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जवळच्या कृषी अधिकारी केंद्र किंवा विमा कंपन्यांशी संपर्क साधू शकतात. त्याचबरोबर तुम्ही pmfby.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खात्याचे तपशील, जमिनीचे कागदपत्रे इत्यादी गोष्टी अनिवार्य आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास शेतकरी जवळच्या विमा कंपनी, बँक शाखा किंवा जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन आपली समस्या नोंदवू शकतात. त्याचबरोबर शेतकरी 1800-180-1551 या क्रमांकावर कॉल करून आपली तक्रार दाखल करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

 

Back to top button