Girish mahajan | “मोतीबिंदूसारखा त्यांच्या डोळ्यांवर हिंदुत्वविरोधी बिंदू आला”; राऊतांच्या टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई : हिंदू समाजाच्या वतीने रविवारी मुंबईत ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतरण’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विरोधात कायदे करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्च्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

“केंद्रात 8 वर्षांपासून हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा हे दोन्ही प्रबळ आणि शक्तीमान नेते आहेत. तरीही ‘धर्मांतरण’ आणि ‘लव्ह जिहाद’सारखे विषय घडत असतील, तर हे त्या सरकारचं अपयश आहे”, अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेला आता भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

“संजय राऊतांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. मोतीबिंदूसारखा त्यांच्या डोळ्यांवर हिंदुत्वविरोधी बिंदू आला आहे. राहुल गांधींबरोबर ते काश्मीरमध्ये फिरत आहेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेने हिंदूत्वापासून फारकत घेतली आहे. त्यांना हिंदू शब्दाची सुद्धा अ‍ॅलर्जी झाली आहे. या नैराश्यातून अशी वक्तव्य करण्यात येत आहे”, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

“संजय राऊत हिंदूत्वाबरोबर फारकत घेऊन गळ्यात गळे घालून कोणसोबत फिरतायत हे सर्वांना दिसत आहे. वेळ प्रसंगी एमआयएमबरोबर सुद्धा ते जाऊन बसले आहेत. त्यांच्याकडे आमदार, खासदार आणि शिवसैनिकही राहिले नाहीत. ते सगळे एकनाथ शिंदेच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले असून, नैश्यातून पाहिजे ते बोलत आहेत,” असा खोचक टोला गिरीश महाजनांनी संजय राऊतांना लगावला आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर भाजपने मोर्चे काढले नाहीत?’ असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना गिरीश महाजनांनी म्हणाले की, “याला कोणताही अर्थ नाही. अनेक जणांच्या तोंडून असे शब्द निघाले आहेत. भाजप त्यांचे समर्थन करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांना आदर आहे”, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.