Sanjay Raut | “मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली, कारण…; राऊतांची मोर्चावरुन भाजपवर टीका

Sanjay Raut | मुंबई : सकल हिंदू समाजाने रविवारी मुंबईत ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यावरून विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील भाजपवर सडकून टीका केली आहे.

“कालचा मोर्चा हा कुणाविरोधात होता हे कळलंच नाही. तो भाजपचाच मोर्चा होता. पण केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना मोर्चा काढण्याची गरज काय होती? कालचा मोर्चा हा मोदी आणि शहा यांच्या विरोधातील होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा मोर्चेकऱ्यांच्या तोंडात बूच का बसले होते?” असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

“ती भाजपची रॅली होती. ‘हिंदू जन आक्रोश’ नाव दिलं. असं काही नव्हतं. कालचा जो काही मोर्चा काढला असा म्हणतात तो कोणी आणि कोणाविरोधात काढला हे स्पष्टच झालं नाही. मला वाटतं भाजप महाराष्ट्र युनिट आहे त्यांनी मोदींविरोधात आक्रोश मोर्चा काढला की काय असा लोकांचा गैरसमज आहे. मोर्चाचं नेतृत्व भाजपचे लोकच करत होते. फक्त कपडे बदलले होते. लोक तीच होती. मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली. कारण भाजपने हा मोर्चा मोदींच्या विरोधातच काढला होता”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

पराभवाचे हादरे बसू लागले की, भाजप त्यांचा हुकमी खेळ सुरु करीत असतो, आताही त्यांनी हिंदूड मुसलमान हा खेळ सुरु केला आहे. देशभरातील हिंदू अचानक खतऱ्यात आला असून धर्मांतराविरोधी कायदा, ‘लव्ह जिहाद’ अशा मुद्द्यांवर भाजप आणि त्यांच्या मिंधे गटाने मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढला. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्याचे सांगितले गेले, पण आघाडीवर भाजपचेच लोक होते. आम्ही सगळे हिंदू म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहोत. असे या मंडळीने जाहीर केले, पण हे मोर्चे आणि आंदोलन म्हणजे स्वत:च्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात आणि केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांता रामराज्यच चालले आहे आणि हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा आक्रोश मोर्चा निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.