Uddhav Thackeray | “हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्यांच्या राजवटीत ‘हिंदू खतरे में’ म्हणण्याची वेळ आलीय”; ठाकरे गटाचा टोला 

Uddhav Thackeray | मुंबई : लव्ह जिहादला विरोध दर्शविण्यासाठी आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदू समाजाने काल मुंबईत विरोट मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये शिंदे गट आणि भाजपचे काही नेतेही सहभागी झाले होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. अशातच आता ठाकरे गटाने ‘सामना’तून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

काय म्हंटलंय ‘सामना’त?

“पराभवाचे हादरे बसू लागले की, भारतीय जनता पक्ष त्यांचा हुकमी खेळ सुरू करीत असतो. आताही त्यांनी हिंदू-मुसलमान हा खेळ सुरू केला आहे. देशभरातील हिंदू अचानक ‘खतऱ्या’त आला असून धर्मांतरविरोधी कायदा, ‘लव्ह जिहाद’ अशा मुद्यांवर भाजपा व त्यांच्या मिंधे गटाने मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढला. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्याचे सांगितले गेले, पण आघाडीवर भारतीय जनता पक्षाचेच लोक होते”, असा दावा करत ठाकरे गटाने भाजपला सुनावलं आहे.

‘आम्ही सगळे हिंदू म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहोत,’’ असे या मंडळींनी जाहीर केले, पण हे मोर्चे व आंदोलन म्हणजे स्वतःच्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार आहे”, अशी टीका ठाकरे गटाने भाजपावर केली आहे.

“महाराष्ट्रात व केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे. हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा ‘आक्रोश मोर्चा’ निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवे. या आधीच्या काळात ‘इस्लाम खतरे में है’ असे मुस्लिम समाज म्हणत असे. आता हिंदुत्ववादी वगैरे म्हणविणाऱ्यांच्या राजवटीत ‘हिंदू खतरे में’ असे म्हणण्याची वेळ हिंदूंवर आली आहे, असा टोला ठाकरे गटाने  लगावला.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.