Madhya Pradesh Travel Guide | फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर मध्य प्रदेशमधील ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

Madhya Pradesh Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये पर्यटकांसाठी अनेक आकर्षक ठिकाणं आहेत. या पर्यटन स्थळांना देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. भारतातील प्रत्येक राज्यात आकर्षक पर्यटन ठिकाणं आहे. या ठिकाणी मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत प्रवास करण्याची वेगळीच मजा असते. तुम्ही पण जर भारतातील काही आकर्षक ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मध्य प्रदेशमधील आकर्षक पर्यटन ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. मध्य प्रदेशमधील पुढील ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकतात.

खजुराहो

मंदिरांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले खजुराहो शहर हे एक अत्यंत प्रसन्न ठिकाण आहे. खजुराहो येथील मंदिर आणि त्यावर साकारलेली शिल्पे जगभर प्रसिद्ध आहे. खजुराहोमधील स्थापत्यकला बघण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेट देतात. या ठिकाणी तुम्हाला अनेक आकर्षक धबधबे बघायला मिळतील.

भेडाघाट

भेडाघाट हे एक मध्य प्रदेशमधील अतिशय सुंदर ठिकाण आहे. संध्याकाळच्या वेळी हे ठिकाण आणखीनच सुंदर दिसतं. मध्यप्रदेशमधील हे एक ऑफबीट डेस्टिनेशन आहे. त्यामुळे तुम्ही जर मध्य प्रदेशला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट दिली पाहिजे.

पंचमढी

तुम्हाला जर निसर्गामध्ये तुमची सुट्टी साजरी करायची असेल, तर पंचमढी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पंचमढीला सातपुड्याची राणी म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण जंगल आणि पर्वतांनी वेढलेले सुंदर हिल स्टेशन आहे. या ठिकाणी तुम्हाला भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक रजत प्रताप धबधबा बघायला मिळेल.

ओरछा

ओरछा हे मध्य प्रदेशमधील एक छोटे आणि सुंदर शहर आहे. या ठिकाणी सुंदर आणि आकर्षक किल्ले व राजवाडे आहेत. या शहराच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जंगल सफारीचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही जर मध्य प्रदेशला फिरायला जाण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही ओरछा शहराला नक्की भेट दिली पाहिजे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.