Magh Vari Utsav | उद्या पासून श्रीक्षेत्र अनवा येथे माघी यात्रा उत्सवास प्रारंभ

Magh Vari Utsav | भोकरदन: गेल्या अनेक दशकांपासून मराठवाड्यातील छोटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील अनवा या गावात माघ वारी उत्सवास सुरुवात होत आहे. या उत्सवाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये हा उत्सव साजरा होत आहे. अनवा येथील संत श्री विठोबा दादा महाराज श्रीरुक्मिणी पांडुरंग संस्थानाद्वारे या उत्सवाचे आयोजन केले जाते.

यावर्षी माघ शु.दशमी दि.३१ जानेवारी २०२३ मंगळवार ते माघ शु.त्रयोदशी दि.०३ फेब्रुवारी २०२३ गुरुवार या कालावधीत संत श्री विठोबा दादा महाराजांच्या व संत श्री गोपीनाथ महाराजांच्या कृपेने व परमपूज्य गुरुवर्य श्रीज्ञानेश्वर महाराज चातुर्मास्ये यांच्या मार्गदर्शनाने कीर्तन, प्रवचन आणि सामाजिक कार्यक्रमानी हा उत्सव संपन्न होणार आहे.

संत सद्गुरु श्री विठोबा दादाम हाराजांनी सतराव्या शतकात श्रीक्षेत्र अनवा येथे भगवान श्रीपांडुरंगाची व आईसाहेब रुख्मिणी मातेची स्थापना केली होती. तेव्हापासून आता पर्यंत उत्सवाची परंपरा कायम आहे, यंदाचा अंदाजे २७६ वा उत्सव साजरा होत आहे.

उत्सवातील मुख्य कार्यक्रम-  दि.३१ जानेवारी रोजी सायं ७ पालखी सोहळा, नगरप्रदक्षिणा, रात्री ९ ते ११ कीर्तनसेवा होईल. दि.०१ फेब्रु. रोजी दु.१ वा. भव्य रथउत्सव श्रींची मिरवणूक, दिंडी सोहळा व स.१० ते दु. ४ या वेळेत भव्य रक्तदान शिबिर/रोगनिदान शिबिर आणि सायं. ७ ते ९ – कीर्तन सेवा असेल. दि.०२ फेब्रु.२२ रोजी द्वादशी, महाप्रसाद सायं.७ ते ९ – कीर्तन सेवा पार पडेल. दि.०३ फेब्रु. रोजी संत सद्गुरु श्री विठोबा दादा महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात सायं.५ वा. श्रीसंस्थानचे पंधरावे पिठाधिश परमपुज्य गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर महाराज चातुर्मास्ये यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल, जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीसंस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.