Saffron Milk | नियमित केशर दूध प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Saffron Milk | टीम महाराष्ट्र देशा: केशर हा एक असा मसाला पदार्थ आहे ज्याचा वापर जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. आयुर्वेदामध्ये केशराला औषधी गुणधर्माचा खजिना म्हटले जाते. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन ए, फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि आयरन आढळून येते. त्यामुळे केशराचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्ही केशराचे सेवन दुधामध्ये मिसळून करू शकतात. केशव दूध प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. केशर दुधाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात

रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते

नियमित केशर दूध प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. केशरामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे नियमित या दुधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

पचनसंस्था निरोगी राहते

केशर दूध पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर केशर दुधाचे नियमित सेवन केल्याने पोट दुखी, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील दूर होऊ शकतात. केशर दुधाच्या नियमित सेवनाने पचन सुधारण्यास मदत होते.

हाडे मजबूत होतात

नियमित केशर दुधाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होऊ शकतात. त्याचबरोबर हे दूध प्यायल्याने सांधेदुखीच्या समस्यापासून देखील आराम मिळू शकतो. केशर दुधात माफक प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम आढळून येते, त्यामुळे केशर दुधाचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात.

केशर दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नियमित याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. मात्र, केशराचे नेहमी मर्यादित सेवन केले गेले पाहिजे. अन्यथा आरोग्याला हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्याचबरोबर वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या