Amol Mitkari | तुकाराम महाराजांवरील विधानानंतर अमोल मिटकरी संतापले; म्हणाले, “बागेश्वर बाबा जिथे दिसेल तिथे…”

Amol Mitkari | नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची, असे विधान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारला देखील सुनावलं आहे.

शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात बुवा-बाबांचं पीक फोफावलं असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हंटल. “आईसाहेब उर्फ जिजाबाई स्वत: भंडारा डोंगरावर त्यांच्या पतीची सेवा करत होत्या. तुकोबांचा प्रचंड अभिमान असणाऱ्या आईसाहेबांबद्दल ज्या पातळीवर जाऊन त्याने विधान केलं आहे. मला असं वाटतं की वारकरी सांप्रदाय काय आहे, हे या वेड्याला माहिती नाही”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

“वारकरी सांप्रदायाला आणि त्याचा अधिष्ठानाला जर असा पापी आणि बेअक्कल असलेला महाराज काही बोलत असेल, तर मला असं वाटतं की वारकरी सांप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी. हा जिथे दिसेल, तिथे याला ठोकून काढा”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :