Rupali Patil | “चित्रा वाघ तुम्ही फक्त उर्फीबद्दल बोला, जोतिबांची तुलना करु नका”

Rupali Patil | पुणे : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ‘चंद्रकांतदादांसारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे’ असं वक्तव्य केल्यानंतर आता राजकारण ढवळून निघाले आहे. विविध स्तरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. चित्रा वाघ यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी संताप व्यक्त केला आहे.

चित्रा वाघ तुम्ही फक्त उर्फीबद्दल बोला, जोतिबांची तुलना करु नका, असं रुपाली पाटील म्हणाल्या. जोतिबांच्या नखाएवढं तरी चंद्रकांत पाटलांचं काम आहे का?, महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी जे काम केलं त्याचा थोडा तरी अंश भाजपच्या नेत्यांमध्ये आहे का? असा खोचक सवाल रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी केला आहे.

दरम्यान, त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. “आम्ही चित्रा वाघ यांना खूप प्रगल्भ समजत होतो, मात्र मानसिक संतुलन ढासळल्यासारखे त्या वागत आहेत. आज त्यांनी कमाल केली. त्यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना चक्क महात्मा जोतिराव फुले यांच्यासोबत केली आहे. तुम्ही तुमच्या नेत्यांना खूश करण्यासाठी असे वक्तव्य करत आहात. अशी वक्तव्ये जरूर करावीत, मात्र यामध्ये महापुरुषांना घेऊ नये,” अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

चित्रा वाघ यांचं वक्तव्य काय?

“काही मिनिटांपूर्वी दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. मी नेहमीच म्हणते की आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा सुभेच्छा देते,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :