Red Spots | चेहऱ्यावरील लाल डाग दूर करण्यासाठी वापरा ‘या’ घरगुती पद्धती

Red Spots | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकाला सुंदर आणि डागमुक्त त्वचा (Skin) हवी असते. पण बदलत्या जीवनशैलीमुळे, खराब आहारामुळे आणि ताण-तणावामुळे त्वचेशी संबंधित समस्या निर्माण व्हायला लागतात. अनेकांना पिंपल्सच्या समस्या उद्भवतात. तर, काही लोकांच्या चेहऱ्यावर लालसरपणा येऊन खाज सुटते. तर अनेकांना लाल डागांच्या समस्येला झुंज द्यावी लागते. चेहऱ्यावर आलेले लाल डाग दिसायला खूप वाईट दिसतात. त्यामुळे हे डाग दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. तुम्ही पण जर हे लाल डाग दूर करण्यासाठी उपाय शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. चेहऱ्यावरील लाल डाग काढण्यासाठी पुढील घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात.

आईस पॅक

चेहऱ्यावरील लाल डाग दूर करण्यासाठी आईस पॅक उपयुक्त ठरू शकतो. आईस पॅकचा वापर केल्याने खाज, जळजळ आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते. आईस पॅक चेहऱ्यावर लावण्यासाठी तुम्हाला तो एका सुती कापडामध्ये गुंडाळून घ्यावा लागेल. नंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर त्याची मसाज करावी लागेल. दिवसातून दोन ते तीन वेळा हे केल्यावर चेहऱ्यावरील सूज आणि लाल कमी होऊ शकतात.

खोबरेल तेल

खोबरेल तेलाचा प्रभाव थंड असतो. त्यामुळे चेहऱ्यावरील लाल डाग काढण्यासाठी खोबरेल तेल मदत करू शकतो. खोबरेल तेलामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात, जे चेहऱ्यावरील सूज आणि लाल डाग कमी करू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावरील लाल डाग काढण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकतात

काकडीचा रस

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही काकडीच्या रसाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला काकडीचा रस किसून त्यामधून रस काढून घ्यावा लागेल. त्यानंतर हा रस तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावर लावू शकतात. दहा ते पंधरा मिनिटे हा रस चेहऱ्यावर ठेवल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा ताज्या पाण्याने धुवावा लागेल. या रसाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील लाल डाग दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.