Eknath Khadse | “निवडणूक जवळ आल्या की भाजप…”; एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

Eknath Khadse | मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन 7 महिने उलटले. मात्र अद्यापही राज्यात मंत्रिमंडळाता विस्तार झालेला नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

“राज्याचा सगळा कारभार फक्त 18 मंत्री पाहत आहेत. यामुळे योग्य निर्णय होऊ शकत नाहीत. सध्याचं सरकार अस्थिर असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर हे सरकार अवलंबून आहे. त्यामुळे हे सरकार केवळ नाममात्र आहे. त्यांच्यात समन्वयाचा आभाव आहे”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

“सात महिने होत आले तरी राज्यातील 18 मंत्रीच राज्याचा कारभार करत आहेत. हे मंत्री योग्य निर्णय घेऊ शकत नसल्याने सर्वत्र अनागोंदीची परिस्थिती आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री शिंदे सरकारने केला तर शिंदे यांच्या पक्षातील, भाजपमधील सर्वच आमदार, नेते मंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत. या सर्वांना मंत्री मंडळात सामावून घेणे शक्य नाही. हा शिंदे गट आणि भाजपमधील असंतोष टाळण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकला जात आहे”, असेही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

लव्ह जिहाद विरोधात राज्यात आणि देशात जन आक्रोश मोर्चा काढला जात आहे. लव जिहाद विरोध हा समाजात असला पाहिजे परंतु काही गोष्टी पक्ष किंवा गट निवडणूक जवळ आल्या की, असं काहीतरी करतात. हिंदुत्ववादाच्या माध्यमातून मतदान होण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न असू शकतात”, असेही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबईमध्ये रविवारी झालेल्या जन आक्रोश मोर्चावरुन राज्याच्या राजकारणात प्रतिक्रिया उलटल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.