Amol Mitkari | “हा कसला ‘टी राजा’ हा तर ‘कपटी’ राजा”; अमोल मिटकरींची भाजप आमदारावर बोचरी टीका

Amol Mitkari | नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत भाषण करताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ते धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं विधान केले होते. त्यानंतर अजित पवार यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांकडून आणि हिंदू संघटनांकडून आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले.

त्यानंतर आज हिंदू समाजाच्या मोर्चाप्रसंगी भाजपचे नेते टी. राजा यांनी अजित पवार यांचे नाव न घेता अजित पवार खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“तेलंगणामधील भाजपाचा आमदार टी. राजा याने छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासात नाक खुपसण्याचे काम केले आहे. हा कसला टी राजा हा तर कपटी राजा.”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी टी. राजा यांच्या टीकेवर पलटवार केला. या कपटी राजाला त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भर चौकात नागवं करून फटके मारायला पाहिजे, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला.

“जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यावेळी टी राजांचे हिंदुत्व कुठे गेले होते?”, असा खोचक सवालही मिटकरी यांनी केलाय. पुढे ते म्हणाले, “तेलंगणा मधून आलेला हा आमदार भाजपाने सोडलेलं पिल्लू आहे. तेलंगणाचा आमदार या महाराष्ट्रात येतो आणि महामानवांच्या विरोधात बोलतो. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात अशी वृत्ती वाढू देऊ नये. आज राज्यामध्ये त्यांचे सरकार असताना मोर्चा काढण्यात येत आहे. म्हणजे “बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना”, अशी गत सध्या भाजपची झाली आहे.”

टी. राजा यांचं वक्तव्य काय?

टी राजा म्हणाले, “काही नेते असे म्हणत आहेत की, संभाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई लढली धर्माची नाही. त्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की, एकदा जर तुम्ही संभाजी महाराजांचा इतिहास वाचला असता तर अशा शब्दाचा प्रयोग तुम्ही केला नसता. आज मी केंद्र आणि राज्य सरकारला निवेदन करु इच्छितो की गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे गुढीपाडव्याचा आधीचा दिवस धर्मवीर दिन म्हणून घोषित करा.”

महत्वाच्या बातम्या :