Share

Satyajeet Tambe | “मी तर अपक्ष उमेदवार अन्…”; सत्यजीत तांबेंचं मतदानानंतर स्पष्ट वक्तव्य

🕒 1 min read Satyajeet Tambe | नाशिक : राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापुर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद … Read more

Published On: 

🕒 1 min read

Satyajeet Tambe | नाशिक : राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापुर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

“लवकरच जे मागचे दहा पंधरा दिवसांमध्ये राजकारण (Nashik Politics) झालं. ज्याच्यातून परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. मी तर अपक्ष उमेदवार आहे, अपक्षच राहील. याच्यापेक्षा जास्त कुठलेही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही”, असे स्पष्ट वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केले आहे.

“आज नाशिक (Nashik) पदवीधरच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया सुरू आहे. याच दरम्यान सत्यजीत तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केले आहे. मी तर अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्ष राहील. याच्यापेक्षा जास्त कुठलेही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही. लवकरच जे मागचे दहा पंधरा दिवसांमध्ये राजकारण झालं”, असे सत्यजीत तांबे म्हणाले आहेत.

“ज्याच्यातून परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. याच्यावर जे अर्धसत्य ठेवून ज्या पद्धतीने एकच बाजू मांडली गेली. त्यामुळेच मुद्दाम कुठली प्रतिक्रिया दिली नाही. कारण शब्दाने शब्द वाढू नये आपण ज्या पक्षांमध्ये आयुष्यभर राहिलो. त्या पक्षाला अजून लोकांसमोर वाईट करू नये, म्हणून खरं तर बोललो नाही. वेळ आल्यावर या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार”, असे सत्यजीत तांबे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Maharashtra India Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या